पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये वार्षिक अंदाजपत्रक 20 फेब्रुवारीला सादर केले जाणार आहे. बजेट आलं की आपल्या मतदारसंघाला झुकतं माप मिळावं, यासाठी चढाओढ पहायला मिळते आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदारांमध्ये अशीच काहीशी चढाओढ सुरु झाली आहे. भाजपचे आमदार पिंपरी -चिंचवडचे पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत.
‘यंदा भोसरी आणि चिंचवडपेक्षा पिंपरी विधानसभेला निधीच्या बाबतीत झुकतं माप मिळेल’, असा दावा भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखेंनी केलं आहे. तर दुसरीकडे भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे शंकर जगताप या भाजपच्या आमदारांनी निधीसाठी जोरदार मोठी फिल्डिंग लावली आहे. यावरुन ‘आयुक्त कोणा एका आमदाराच्या ऐकण्यावर निर्णय घेत नाहीत. त्यामुळं भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभेत ते समप्रमाणात निधी वाटप करतील’, असा ठाम विश्वास गोरखेंनी व्यक्त केला आहे.
‘आम्ही सगळे आमदार समन्वयाने काम करतो. आज भोसरीचे आमदार चिंचवडचे आमदार हे आमच्यासाठी सीनियर आहेत. निधी कसा आणायचा ते आम्ही त्यांच्याकडून शिकतो आहे. त्यामुळे आम्ही समन्वयाने वागतो आहे, त्यामुळे नक्कीच चांगल्या प्रकारे आम्ही निधी आणू’, असा विश्वास यावेळी बोलताना गोरखे यांनी व्यक्त केला आहे.
चिंचवडचे शंकर जगताप, भोसरीचे महेश लांडगे आणि पिंपरीतील अमित गोरखे या तिन्ही आमदारांमधील समन्वयाचा अभाव दिसून येतो आहे. या तिघांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आणि स्वतःच्या मतदारसंघात अधिकचा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला. मात्र, आमच्यात समन्वय आहे आणि आमच्यात कोणतीही चढाओढ नसल्याचा दावा शंकर जगताप यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जानेवारी महिन्यात पुणेकरांचा सुखकर प्रवास, पीएमपी अपघातांना ब्रेक; नेमका कसा घडतोय बदल?
-आमदारांना हवाय पालिकेचा कोट्यवधींचा निधी; वार्षिक अंदाजपत्रकात सुरु घुसखोरी!
-कपल्सचे चाळे अन् कॅफेच्या नावाखाली सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी खाकी दाखवताच…
-वराती मागून घोडे: ‘जीबीएस’ उद्रेकानंतर राज्य सरकारला आली जाग! शुद्ध पाण्याबाबत उचललं मोठं पाऊल
-पुण्यातून सुरुवात देशभरात पसरली पाळेमुळे, ११९६ कोटींच्या घोटाळ्याचे पुणे कनेक्शन