पुणे : पुणे महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यामध्ये आता महापालिकेच्या विकासकामांमध्ये आमदारांची घुसखोरी झाल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील आमदारांनी ‘मतदारसंघातील कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करावी’, अशी मागणी आमदारांनी केली आहे. पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अंदाजपत्रकासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आमदारांनी सुचविलेल्या विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शहरातील आमदारांनी कामाची यादी आणि त्यासाठी लागणारा निधी याबाबतची पत्र पालिका आयुक्तांना दिली आहेत. यामध्ये आमदारांनी निधीची मागणी करताना ती १००, २०० आणि ३०० कोटींच्या रकमेत केली आहे. त्यामुळे या आमदारांसाठी प्रशासनाला दोन ते अडीच हजार कोटी निधीची स्वतंत्र तरतूद करावी लागणार आहे. त्याचा थेट भार प्रशासनाच्या अन्य विकासकामांवर येणार असून, मोठ्या आवश्यक प्रकल्पांच्या निधीला मात्र कात्री लावावी लागण्याची शक्यता आहे.
पुण्यातील एका आमदाराने किटकनाशकासाठी लागणाऱ्या एका पावडरच्या खरेदीसाठी १० कोटींच्या निधीची तरतूद करावी, असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. यावरुन आता हे संबंधित एका कंपनीच्या पावडरसाठी आमदारांचा अट्टहास का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच आमदारांनी जरी निधीची मागणी केली असली, तरी संबंधित खातेप्रमुखांशी चर्चा करूनच आवश्यक असेल तरच निधीची तरतूद केली जाईल, असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कपल्सचे चाळे अन् कॅफेच्या नावाखाली सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी खाकी दाखवताच…
-वराती मागून घोडे: ‘जीबीएस’ उद्रेकानंतर राज्य सरकारला आली जाग! शुद्ध पाण्याबाबत उचललं मोठं पाऊल
-पुण्यातून सुरुवात देशभरात पसरली पाळेमुळे, ११९६ कोटींच्या घोटाळ्याचे पुणे कनेक्शन
-‘राजकारणाचा पोरखेळ कोणी केला’ दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमावरुन पुण्यात वादंग, नेमका काय प्रकार?
-पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?