पुणे : विधानसभा निवडणुकीत जवळपास ५७ जागा जिंकत सत्तेमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग असल्याचा देखील दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवलं जात असून कोकणातील बडे प्रस्थ असणाऱ्या राजन साळवी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पुणे शहरात देखील ३ माजी आमदार शिंदेंकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्याने प्रवेश लांबल्याचे बोलले जात आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव सेनेला उतरती कळा लागली असून काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे काही नेते देखील सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला नेत्यांची पसंती मिळत आहे. पुणे शहरातील जवळपास २५ माजी नगरसेवक तसेच तीन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. गेल्या आठवड्यातच हे प्रवेश होणार असल्याचं बोललं गेलं, मात्र अजून एक महिना तरी शिवसेनेत पुण्यात प्रवेश होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांनी त्यांच्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट शिंदें समोर ठेवल्याची चर्चा आहे. तसेच आपल्या ठोस कमिटमेंट मिळाल्यानंतर प्रवेश करण्यावर एक माजी आमदार ठाम असल्याने या प्रवेशांना ब्रेक लागला आहे.
ठाकरेंचा विश्वासू शिलेदार शिंदेंच्या गोटात
रत्नागिरी जिल्ह्यातील बडे प्रस्थ असणारे आणि उद्धव ठाकरेंची विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजन साळवे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’
-Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…
-‘सोलापूरकर जितके दोषी तितकेच तुम्हीही’; अमोल मिटकरींनी पोलीस आयुक्तांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
-RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…
-पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 200 पार