पुणे : पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या वाढत असून वाहतूक कोंडीचे देखील प्रमाण वाढत आहे. अशातच आता ‘केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया’ने २०१९ च्या आधीच्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक केले आहे. राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ लावणे बंधनकारक केले आहे, पुणे, पिंपरी-चिंचवड आरटीओसाठी खासजी एजन्सीची त्यासाठी नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत पुणे जिल्ह्यातील वाहनांना नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. शहरातील वाहनांची संख्या पाहता ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ६९ केंद्रे स्थापन केली आहेत.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना ‘एचएसआरपी’ देणे बंधनकारक केले होते. याबाबत २०१८मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आदेश दिले होते. तसेच २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला होता. या अधिकारा अंतर्गत अनेक राज्यांनी ‘एसएसआरपी’ बंधनकारक केले आहे. मात्र, महाराष्ट्रात अजूनही २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, रोझमां सेफ्टी सिस्टीम लि.’ या कंपनीला हे काम दिले असून https://mhhsrp.com या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत या लिंकवर १० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. २०१९ पूर्वीच्या वाहनांना नंबरप्लेट बसविण्याचे काम जानेवारीपासून सुरु झाले आहे.
नंबर प्लेटसाठी दुचाकी, ट्रॅक्टर – ४५०, तीन चाकी – ५००, चार चाकी व अन्य – ७४५ असे शुल्क असणार आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अधिकृत सेंटरवरूनच बसवून घ्यावी. मदतीसाठी ७८३६८८८८२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 200 पार
-येरवडा-कात्रज प्रवास होणार सुसाट; ‘ट्वीन टनल’च्या निर्मितीला हिरवा झेंडा
-फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा ‘या’ १० स्टेशनवर सुरु
-‘ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागा’; संजय राऊतांंच्या ‘त्या’ टिकेवरुन मनसे आक्रमक
-परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल