पुणे : पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाहतूकीचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय आणि पुणे शहरातील ट्रान्सपोर्ट गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी पुण्यासोबतच नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली.
कात्रज- येरवडा हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा, तसेच यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. याव्यतिरिक्त, पुणे शहरातील विविध विकासात्मक योजना हाती घेण्यात आल्या, ज्या पुण्यासोबत नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरतील.नवीन शहर करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळ, दुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा. सुरुवातीला पुणे महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस दिल्या होत्या. या बसेसमुळे अत्यंत कमी दरात नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता आला. महामंडळांने प्राधिकरणाकडे ५०० बसेसची मागणी केली आहे. या बसेस सीएनजी असाव्यात. भविष्यात कुठल्याही प्रकारे व्यवस्थापनाचा प्रश्न येणार नाही, याची काळजी घ्यावी. पुणे राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी देण्याची कारवाई तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना देखील फडणवीसांनी दिल्या आहेत.
प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी ६३६.८४ कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी बैठकीत २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी १५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमान तळाला चांगली ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या-
-फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा ‘या’ १० स्टेशनवर सुरु
-‘ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागा’; संजय राऊतांंच्या ‘त्या’ टिकेवरुन मनसे आक्रमक
-परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
-शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक
-रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?