पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात मोठा वाद पहायला मिळत आहे. ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय दलाली सुरु असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. ‘कोणालाही कसलेही पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसेही सत्कार करत आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. राऊतांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील योगेश खैरे यांनी केली आहे. इतकंच नाही तर संजय राऊत यांचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल सुद्धा खैरे यांनी केला आहे.
‘दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली’ असे संजय राऊत म्हणाले. हा मराठी माणसाचा, मराठी साहित्याचा, मराठी साहित्यिकांचा, उज्ज्वल मराठी परंपरेचा अपमान आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ पण तुमच्या राजकारणासाठी असा अपमान करणं तुम्हाला शोभतं का? तुम्ही म्हणजे मराठी माणूस, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र. ही संकल्पना डोक्यातून आधी काढून टाका. संजय राऊत यांनी महाराष्ट्राची ताबडतोब माफी मागितली पाहिजे. कालच महाराष्ट्र हिताच्या गप्पा मारणाऱ्या आदित्य ठाकरे यांना हा अपमान मान्य आहे का? असा सवाल करत योगेश खैरे यांनी राऊतांना सुनावलं आहे.
‘हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील राजकीय दलाली आहे. कोणालाही कसलेही पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसेही सत्कार करत आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे? तुम्ही दिल्लीत दलाली करायला आला आहात का? काय साहित्याची सेवा करत आहात, कोण करतंय संमेलन आयोजित?’ असे प्रश्न विचारत संजय राऊतांनी साहित्य संमेलनावर आक्षेप घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
-शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक
-रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
-अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…