पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुर्नबांधणीसाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्वावर प्रकल्प राबवला जाणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला असून महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वय साधत काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘पुणे शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे’, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
“शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरेल. प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी येत्या 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधण्यात यावा. यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवश्यक ते सर्व सांमजस्य करार वेळेत पूर्ण करावेत. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा”, असे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.
शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत आज आढावा बैठक पार पडली. शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीनं पूर्ण करणं आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’… pic.twitter.com/VOeQ5H5v9U
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 12, 2025
या प्रकल्पामध्ये ‘महामेट्रो’ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार असून, त्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये नवीन सामंजस्य करार केला जाणार आहे. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट येथेही अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.
स्वारगेट बस आणि मेट्रो स्थानकाचा शिवाजीनगर बसस्थानकाच्या धर्तीवर होणार विकास…
पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या बांधकामाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील उपमुख्यमंत्री दालनात घेण्यात आला. यावेळी शिवाजीनगर… pic.twitter.com/sFOI3H9BHH
— Madhuri Misal (@madhurimisal) February 12, 2025
या प्रकल्पांतर्गत आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. वाहनतळासाठी दोन तळघर, किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट, तर तळमजल्यावर बसस्थानक, पहिल्या मजल्यावर बसआगार आणि दुसऱ्या मजल्यावर बसवाहनतळ असणार आहे. याशिवाय शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी १६ मजली इमारत उभारली जाणार आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकांच्या विकासामुळे पुणेकरांना जलद, सुयोग्य आणि आधुनिक प्रवासी सुविधा मिळतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
-अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…
-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे