पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी विक” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे मुख्य समन्वयक प्रताप जाधव यांनी सांगितले आहे. या माध्यमातून गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.
पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी प्रकारात होणार आहे. महाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये २५,००० हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बंग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ५.५५,५५५ रुपयांची पारितोषिक देण्यात येताल. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी दि. १४ फेब्रुवारीपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.
जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुले आणि मुलीसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा शनिवार, १५ फेब्रुवारी आणि रविवार १६ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे, युवा खेळाडूंना प्रोत्सहाण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धत एकूण ७०,५५५ रुपयांची बक्षिसे, प्रशिस्तपत्र आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणा-या संघास रुपये १००० आणि हरणा-या संघास रुपये ५०० रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार असून या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार
स्केटिंग अस्सोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने व सहकार्याने रविवार, १६ फेब्रुवारी रोजी हॉटेल शिवांजली पाषाण समोरील रोड, सूस येथे रोलर स्केटिंग च्या रोड रेस स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन जिल्हा असोसिएशनचे सचिव मा. अशोक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून ह्या स्पर्धा ६ वर्षाखालील, ६ ते ८ वर्षे, ८ ते १० वर्षे, १० ते १२ वर्षे १२ ते १४ वर्षे व १४ वर्षावरील मुले आणि मुलीसाठी घेण्यात येणार आहेत. क्वाड, इनलाइन, रेक्रिएशनल इनलाईन ह्या प्रकारात ह्या स्पर्धा घेण्यात येतील. तसेच विशेष मुले आणि मुलीसाठी विशेष वेगळी स्पर्धा घेण्यात असल्याची माहीती समन्वयक उमेश वाघ यांनी दिली.
विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४०० कराटेपडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलीसाठी या स्पर्धा २३ फेब्रुवारी रोजी लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी येथे होणार आहेत. या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील मुले व मुलीसाठी होतील.
सोमेश्वर चषक २०२५ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील. तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून विजेत्यांना रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.
याशिवाय स्वच्छ भारत या विषयावर १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे आहे. इयत्ता १ ली आणि २ री, इयत्ता ३री, ४थी आणि ५वी व इयत्ता ६ वी, ७वी आणि ८वी अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. अमित मुरकुटे यांनी या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली असून एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी, आनंदबन क्लब, औंध, के. संजय निम्हण ग्राम संस्कृती उद्यान, पाषाण आणि राणी लक्ष्मी गार्डन, खडकी येथे चित्रकला स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग निश्चित केला असून प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र, मेडल देण्यात येणार आहेत तर विजेत्यांना विविध स्वरुपात बक्षिसे देण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…
-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे
-सावंतांच्या लेकाला बँकॉकला जाण्यासाठी ६८ लाख, पण तुम्हाला जायचं असेल तर किती खर्च?
-पुण्यातील बड्या मंत्र्यानं सूत्रं हलवली अन् सावंतांच्या लेकाचं विमान हवेतूनच फिरलं माघारी