पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी पसरली आणि राज्यात मोठी खळबळ उडाली. ऋषिराज सावंतच्या अपहरणाच्या बातमीनंतर त्याला तानाजी सावंत यांनी आपली राजकीय ताकद वापरून अवघ्या काही तासात पुणे पोलीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या मदतीने पुण्यात परत आणलं.
ऋषिराज सावंतने मित्रांसह बँकॉकला जाण्यासाठी ऋषीराजने ९ जानेवारीला रविवारी ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेस या कंपनीचं विमान बुक केलं. त्यासाठी तब्ब्ल ६८ लाख रुपये त्याने मोजले होते. मात्र ऋषिराजच्या अधुऱ्या बँकॉकवारीमुळे तब्बल ६८ लाख रुपये पाण्यात बुडाले.
पुण्यातून बँकॉकला जाण्यासाठी किती खर्च?
‘स्काय स्कॅनर’ या वेबसाईटनुसार, पुण्याहून बँकॉकला जाण्यासाठी किमान २४ हजार ते ३८ हजार रुपयांच्या दरम्यान तुम्हाला पैसे माजावे लागू शकतात. तात्काळमध्ये बुकींग केल्यास यापेक्षा आधिकची रक्कम मोजावी लागू शकते. विमान कंपन्यांनुसार, तिकीटाच्या दरामध्ये रक्कम कमी-जास्त होऊ शकते.
ऋषिराजची अधुरी ‘बँकॉकवारी’?
सावंतांनी त्यांची राजकीय ताकद वापरुन मुलाला परत आणलं. यामध्ये नागरी उड्डाण मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांनी केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला अन् मोहोळांनी तातडीनं हालचाली केल्या. नागरी उड्डाण मंत्रालयाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क केला. मग एटीसीनं ऋषिराज प्रवास करत असलेल्या विमानाच्या पायलटशी संपर्क साधला. साडे चार वाजता उड्डाण केलेले विमान त्यावेळी बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होते. ‘तातडीने माघरी फिरा’, अशी सूचना एटीसीकडून पायलटला देण्यात आली अन् बंगालच्या उपसागरावर उड्डाण करत असलेलं ऋषिराजच्या विमानानं हवेतूनच युटर्न घेतला. त्यामुळे ऋषिराजची बँकॉकवारी अधुरीच राहिली.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील बड्या मंत्र्यानं सूत्रं हलवली अन् सावंतांच्या लेकाचं विमान हवेतूनच फिरलं माघारी
-पुण्यात जीबीएसचा धोका वाढतोय; आणखी एका रुग्णाचा मृत्यू
-खेकड्यांनी धरण फोडलं ते मुलाचं अपहरण! तानाजी सावंतांची वादग्रस्त प्रकरणे…
-Pune Traffic: दारु पिऊन गाडी चालवणं तरुणाला पडलं महागात; ५ दिवस जेल अन्…
-पुणे विमानतळावर ‘डिजियात्रे’चा मोहोळांकडून शुभारंभ; मात्र इतर ३३ विमानतळांबाबत दिली ‘ही’ कबुली