पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री आणि वजनदार आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परसरली. या घटनेमुळे पुणे पोलीस, प्रशासन ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची भूमिका बजावली. तानाजी सावंत यांनी आपला मुलगा घरातून निघून गेल्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस प्रशासन ताबडतोब कामाला लागलं आणि ऋषिराज पुणे विमानतळावरुन ६८ लाख रुपये खर्च करुन मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता. इकडे तानाजी सावंत यांनी राजकीय ताकदीचा वापर करत मुरलीधर मोहोळ यांना फोन केला.
मोहोळ यांच्या एका फोनमुळे ऋषिराजची बँकॉकवारी ही अर्धीच राहिली. ऋषिराज सावंत हा पुणे विमानतळावरुन खासगी विमानाने बँकॉकला निघाला होता. यासाठी ऋषिराजने ६८ लाख रुपये खर्चही केले होते. मात्र, वडिल तानाजी सावंत आणि पत्नीचा बँकॉकला जाण्यासाठी नकार होता. म्हणून सावंतांनी राजकीय ताकद पणाला लावत मुलाला माघारी आणलं.
ऋषिराज सावंतनेप्रवास केलेल्या खासगी विमान नेमके कोणाच्या मालकीचे आहे? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रायव्हेट चार्टर्डच्या तिकीटवर या ‘Global Passenger Manifest’ या कंपनीचा पत्ता देण्यात आलेला आहे. कंपनीच्या पत्त्यावर एका खाजगी बिल्डरचे ऑफिस आहे. तीन ते साडेतीन वर्ष अगोदर या कंपनीचा ऑफिस या इमारतीत होतं. त्यामुळे ही कंपनी अस्तित्त्वात आहे की नाही? हे विमान कोणाच्या मालकीचं आहे? यंत्रणेकडून या कंपनींची पडताळणी करण्यात आली की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे
-सावंतांच्या लेकाला बँकॉकला जाण्यासाठी ६८ लाख, पण तुम्हाला जायचं असेल तर किती खर्च?
-पुण्यातील बड्या मंत्र्यानं सूत्रं हलवली अन् सावंतांच्या लेकाचं विमान हवेतूनच फिरलं माघारी
-पुण्यात जीबीएसचा धोका वाढतोय; आणखी एका रुग्णाचा मृत्यू
-खेकड्यांनी धरण फोडलं ते मुलाचं अपहरण! तानाजी सावंतांची वादग्रस्त प्रकरणे…