पुणे : राज्यसह पुण्यात ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत असून या आजाराने आणखी एकाचा बळी घेतला आहे. पुणे शहरात सोमवारी गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराच्या ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जीबीएसमुळे शहरातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांची संख्या ७ वर पोहचली असून पुण्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जीबीएस आजारातून ९१ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बिबवेवाडी येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. वाहनचालक असलेल्या या रुग्णाला ३१ जानेवारीपासून त्रास सुरू झाला होता. त्याला भारती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेल्यानंतर त्याचा एमआरआय करण्यात आला. नातेवाइकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी रूग्णाला नातेवाइकांनी निपाणी येथे नेले. रुग्णाचा त्रास वाढल्याने त्याला सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
तिथेही या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यामुळे त्याची नर्व्ह कंडक्शन तपासणी करून जीबीएसचे उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ५ फेब्रुवारी रोजी नातेवाइकांनी वैद्यकीय सल्ल्याविरुध्द डिस्चार्ज घेतला आणि त्याच दिवशी त्याला पुन्हा पुण्यात आणून संध्याकाळी कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. कमला नेहरु रुग्णालयामध्ये त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या रुग्णाला कार्डिअॅक अरेस्टचा त्रास जाणवू लागला. त्याला ३० मिनिटे सीपीआर देण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान रात्री १० वाजता रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती मृत्यू अहवालात देण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १९२ रुग्णांपैकी ९१ रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, ३९ रुग्ण पुणे मनपा, २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, २५ रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि ८ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या घरी जात सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-खेकड्यांनी धरण फोडलं ते मुलाचं अपहरण! तानाजी सावंतांची वादग्रस्त प्रकरणे…
-Pune Traffic: दारु पिऊन गाडी चालवणं तरुणाला पडलं महागात; ५ दिवस जेल अन्…
-पुणे विमानतळावर ‘डिजियात्रे’चा मोहोळांकडून शुभारंभ; मात्र इतर ३३ विमानतळांबाबत दिली ‘ही’ कबुली
-Pune: महापालिका निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्वाची माहिती
-“दादा बोलले असतील तर फायनल…”, पालिका निवडणुकीबाबत सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य