पुणे : नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा या निवडणुकीत दारुण पराभव केला आहे. केजरीवाल हे जवळपास १२०० मतांनी पराभूत झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत आम आदमीला मोठा धक्का बसला आहे. अशातच या निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तसेच आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडी असती तर भाजप पक्ष २० जागांच्या पुढेही गेला नसता’, असे म्हणत रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष शिसोदिया ७०० मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना ७ हजार ३५० मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास ३हजार ४०० मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना ४ हजार ५०० हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा ११ हजार मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला १८ हजार मते मिळाली. २० हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे. दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन इंडिया आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढतील का? हा खरा प्रश्न आहे.”
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन!
१५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती.दिल्ली…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 8, 2025
दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष शिसोदिया ७०० मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना ७३५० मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास ३४०० मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना ४५०० हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा ११००० मतांनी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 8, 2025
दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचे मतदान झाले तर आज निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या पराभव हा अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. यावर सर्वच राजकीय नेत्यांनी आपापली मते मांडत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आई म्हणावं की कसाई; पोटच्या चिमुरड्यांचा गळा आवळला, अन्…
-पुण्याच्या गुन्हेगारीला बसणार चाप; पुणे पोलिसांनी आखली ‘ही’ मोठी योजना
-पोलीस दलात मोठी खळबळ; पीएसआयने संपवलं जीवन, नेमकं कारण काय?
-ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, ठाकरेंचा ‘मास्टर प्लान’ काय?
-पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत पुणेकरांच्या करवाढीसाठी महत्वाचा निर्णय