पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. एकीकडी पुणे पोलीस शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अनेक विविध उपाययोजना आखत आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या उपाय योजना, कायदे कानून याचा कसलाच विचार न करता गुन्हे करताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील शिंदे परिसरातील एका महिलेने आज पहाटे पोटच्या २ चिमुरड्यांचा झोपेत गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या २ चिमुरड्यांचा गळा आवळला आणि त्यानंतर या क्रूर महिलेने तिच्या पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जन्मदात्या आईने २ चिमुकल्यांची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या ३० वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. शंभू दुर्योधन मिढे (वय १ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. आरोपी महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे (वय ३५ वर्ष) याच्यावरही कोयत्याने मानेवर आणि हातावर वार करून जखमी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या गुन्हेगारीला बसणार चाप; पुणे पोलिसांनी आखली ‘ही’ मोठी योजना
-पोलीस दलात मोठी खळबळ; पीएसआयने संपवलं जीवन, नेमकं कारण काय?
-ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, ठाकरेंचा ‘मास्टर प्लान’ काय?
-पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत पुणेकरांच्या करवाढीसाठी महत्वाचा निर्णय
-Pune GBS: ‘जीबीएस’मुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू; रुग्णसंख्या १७३ वर