पुणे : राज्यात ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ या आजाराने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात असून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील बुधवारी सायंकाळी काशीबाई नवले रुग्णालयात ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. मृत्यू झालेल्या ६३ वर्षीय पुरुष हे कर्वेनगरमधील रहिवासी आहेत.
२८ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, जुलाब आणि अशक्तपणाचा जावणू लागला होता. त्यामुळे त्यांना आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात येत होते. बुधवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जीबीएसचा सातवा बळी आहे. ‘राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ७२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ७२ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे’, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, पुणे महापालिका ३४, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ८७, पिंपरी-चिंचवड महापालिका २२, पुणे ग्रामीण २२ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर…’; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?
-मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं
-‘आता जर शिट्या वाजवल्या तर…’; अजित पवारांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम
-‘माझी लाडाची पिनू..’ म्हणत शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द