पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणा सोबतच त्यांच्या मिश्किल वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. पिंपरी चिंचवडमध्ये नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेते मंत्र्यांच्या उपस्थित होते. या झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक युद्ध पहायला मिळालं. या कार्यक्रमानंतर अजित पवार चाकण दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केल्याचं पहायला मिळालं.
पिंपरी चिंचवडमधील अनेक विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही हातांमध्ये AK47 बंदुका घेतल्या. फडणवीस AK47 हातात घेऊन लक्ष्यावर निशाणा साधत होते. तर दुसरीकडे अजित पवारांनी बंदूक हातात घेत जमलेल्या पत्रकारांवरच निशाणा साधला.
‘महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर एकेकाला आम्ही दोघे उडवून टाकू’, असे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले आहे. त्यांच्या या मिश्किल विधानाने जमलेले सर्वजण मोठ्याने हसले. त्यानंतर हसत हसत दादांनी ‘आता हे पत्रकार एवढंच छापणार’ असे वक्तव्य देखील करायला अजित पवार विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं
-‘आता जर शिट्या वाजवल्या तर…’; अजित पवारांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम
-‘माझी लाडाची पिनू..’ म्हणत शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द