पुणे : आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानास पोलीस विभागाच्या माध्यमातून देखील संपूर्ण सहकार्य आगामी काळामध्ये राहणार आहे. पोलीस स्टेशन परिसराच्या स्वच्छते सोबतच कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली वाहन अस्ताव्यस्त पडणार नाहीत, रस्त्यावरील वाहनांची पार्किंग व्यवस्थितपणे व्हायला हवी, याची देखील आम्ही काळजी घेऊ, एक लोकप्रतिनिधी आपला मतदारसंघात चांगला उपक्रम राबवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जात असल्याचे कौतुक असल्याची भावना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. क्लीन सिटी इंदौरला निघालेल्या अभ्यास दौऱ्याच्या प्रस्थानपूर्व कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत ३ दिवसीय ‘क्लीन सिटी इंदौरचा अभ्यास दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याचा प्रस्थानपूर्व समारंभ पुणे महापालिकेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार हेमंत रासने यांच्यासह महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रसिद्ध उद्योजक सुधीर मेहता, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम, भाजप कसबा अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह पलिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, कसबा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आज इंदौर बघायला निघालोय, पुढील वर्षी लोक स्वच्छ आणि सुंदर कसबा बघायला नक्की येतील..!
स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा मतदारसंघाचा ध्यास घेऊन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या पहिल्या दिवसापासून आपले कार्य सुरू आहे. या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून गेली सात वर्षांपासून स्वच्छ… pic.twitter.com/CY1zhaq7gE
— Hemant Rasane (@HemantNRasane) February 5, 2025
“कसबा मतदारसंघाला भारतातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि विकसित मतदारसंघ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्य केले जात आहे. आज सर्वांसोबत क्लीन सिटी इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघालो असून तेथील स्वच्छतेच्या बाबतीत करण्यात आलेल्या उपाययोजना आगामी काळामध्ये आपल्याकडे राबवण्याचा येतील. यंदा इंदौरला जात असलो तरी पुढील वर्षी लोक स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा बघायला येतील हा आमचा संकल्प आहे”, असं हेमंत रासने यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी पुणे महानगरपालिकेचे १०० पेक्षा जास्त सफाई कर्मचारी, कसबा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते, गणेश मंडळ कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शिक्षक अशा तीनशे जणांचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच सफाई कर्मचारी राज्याबाहेर जात असल्याचंही हेमंत रासने म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या ‘मिशन पुणे’ला ठाकरे देणार टक्कर; पुण्यासाठी आखला खास प्लान, नाराजांना रोखण्यात यश येणार?
-मोठी बातमी: संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने उचललं मोठं पाऊल; अवघ्या ३०व्या वर्षी संपवलं जीवन
-गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी
-आमदार झाल्याचा आनंद साजरा करत हत्तीवरुन वाटले पेढे, अन्….; अजित पवारांचा ‘तो’ आमदार कोण?