पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला गळती लागली आहे. ठाकरे सेनेतील नेते पदाधिकारी हे भाजपमध्ये जाणे पसंत करत असल्याने ठाकरे सेनेत नाराज असलेल्या तसेच पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘मिशन पुणे’ लाँन्च केले असल्याच्या सांगितले जात आहे. या नाराजांना रोखण्यात कुठेतरी स्थानिक नेते कमी पडत असल्याने आता ही गळती रोखण्यासाठी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
स्थानिक स्वराज्या संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ठाकरेसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हडपसरमधील काही पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत दाखल झाले आहेत. दोन माजी आमदार आणि आणखी काही ठाकरे सेनेचे पदाधिकारी लवकरच शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा देखील शिंदे सेनेकडून करण्यात येत आहे. मात्र, याच नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांची नुकतीच काही स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत पुण्यामध्ये येण्याची विनंती केली होती.
यावरुन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये येऊन शाखाप्रमुख यांना भेटणार आहेत. त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या नाराजांना स्थानिक पदाधिकारी ‘साहेब येणार आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत’, असे सांगून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पुण्यातील शहर प्रमुख आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात ठाकरे सेनेची एक बैठक झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत आढावा घेण्यात आला.
पुण्यात ठाकरे सेनेच्या २१ शाखा असून काही ठराविक शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेला नवी उर्जा देण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शाखाप्रमुखांशी संवादही साधणार आहेत. त्यामुळे आता येत्या काळात शिंदे-ठाकरेंचा संघर्ष पुण्याच्या मैदानातही पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी: संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने उचललं मोठं पाऊल; अवघ्या ३०व्या वर्षी संपवलं जीवन
-गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी
-आमदार झाल्याचा आनंद साजरा करत हत्तीवरुन वाटले पेढे, अन्….; अजित पवारांचा ‘तो’ आमदार कोण?
-‘ऑपरेशन टायगर’साठी एकनाथ शिंदेंचं ‘मिशन पुणे’; ३ माजी आमदार लागले गळाला!