पुणे : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात आपले जीवन संपवले आहे. त्यांनी घरात पंख्याला उपरण्याने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात तसेच वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण समोर आलं आहे.
अवघ्या ३० वर्षीय शिरीष मोरे यांचा शिवव्याख्याते म्हणून मोठा नावलौकीक होता. गेल्या २० दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता आणि येत्या एप्रिलमध्ये विवाह देखील होणार होता. मात्र लग्नानंतर नव्या आयुष्याला सुरवात करण्याआधीच त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता वैकुंठ भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी देहूमध्ये राहत्या घरी आत्महत्या केली आहे. रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. आर्थिक विवंचेनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उलल्याचं प्राथमदर्शी दिसून येत आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी
-आमदार झाल्याचा आनंद साजरा करत हत्तीवरुन वाटले पेढे, अन्….; अजित पवारांचा ‘तो’ आमदार कोण?
-‘ऑपरेशन टायगर’साठी एकनाथ शिंदेंचं ‘मिशन पुणे’; ३ माजी आमदार लागले गळाला!
-Pune Froud: ब्रँडेड वॉच खरेदी करताय; आधी ही बातमी वाचा…
-फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?