पुणे : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ यश मिळालं आहे. विजयाचा राज्यभर जल्लोष पहायला मिळाला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे भोरचे आमदार शंकर मांडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा जल्लोष करणं चांगलचं महागात पडल्याचं पहायला मिळत आहे. शंरक मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुटमध्ये हत्तीवरुन मिरवणूक काढत पेढे वाटले. जंगी उत्साह साजरा करण्यात आला. मात्र हा उत्साह आता मांडेकरांच्या आंगलट आला आहे.
मांडेकर यांच्या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक राहूल बलकवडे आणि हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थान देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हत्ती सध्या जिथे आहे, त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे आमदार असलेल्या शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली होती. मांडेकर आमदार बनल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी सांगलीवरुन हत्ती मागवला होता. मांडेकर आमदार झाले यासाठी या हत्ती वरुन १२५ किलो पेढे वाटले. मात्र वनविभागाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘ऑपरेशन टायगर’साठी एकनाथ शिंदेंचं ‘मिशन पुणे’; ३ माजी आमदार लागले गळाला!
-Pune Froud: ब्रँडेड वॉच खरेदी करताय; आधी ही बातमी वाचा…
-फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?
-Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा