पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांकडून तयारी सुरु आहे. पक्षबांधणी पक्षश्रेष्ठींकडून राजकीय दौरे, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु आहेत. अशातच ठाकरेंच्या सेनेला पुण्यात चांगलीच गळती लागल्याचे पहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक पक्षाला ‘राम राम’ करून भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. ठाकरे सेनेचे अन्य काही नेते तसेच काँग्रेसचे माजी आमदार आणि काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.
राज्यभर शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढत असली तरीही पुण्यात मात्र शिंदेसेनेत प्रवेश करणं सोडून अनेक नेते, पदाधिकारी हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्थानिक नेतृत्वावर चांगलेच नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभर ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील नेते शिंदेंच्या सेनेत घेण्याची रणनिती आखली जात आहे. तसेच आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ‘मिशन पुणे’ लाँच केले असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर या दोन माजी आमदारांसह काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. महादेव बाबर आणि रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने हे दोन्ही नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील मागील आठवड्यात खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीतून निघून आल्याने शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.
ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नेत्यांच्या आगामी काळात शिंदे सेनेत पक्षप्रवेश घडून आणण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रलंबित निकालामुळे हे पक्षप्रवेश लांबले असल्याचे देखील शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Froud: ब्रँडेड वॉच खरेदी करताय; आधी ही बातमी वाचा…
-फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?
-Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
-पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ३०० कोटींची संपत्ती? उघड चौकशीची मागणी