पुणे : पुणे शहरात चोरी, सायबर फसवणूक, फसवणूकीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. पुणे शहरात मोठी बाजारपेठ असून राज्यातील तसेच परराज्यातून अनेक जण खरेदीसाठी पुण्यात येत असतात. अशातच खरेदी करताना अनेकदा ब्रँडेड वस्तूंकडे ग्राहकांचा कल असतो. ब्रँडेड घड्याळ उत्पादक कंपनीच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री सुरु असल्याचे आता उघडकीस आले आहे. शुक्रवार पेठेतील एका दुकानावर गुन्हे शाखेने छापा टाकला असून या छापेमारीत तब्बल १७५ बनावट घड्याळे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात कॉपीराईट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत देवजीबाई प्रजापती (रा. शनिवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शुक्रवार पेठेतील शहाबीया सोसायटीतील चामुंडे नॉव्हेल्टीज येथे ही कारवाई करण्यात आली. शुक्रवार पेठेतील एका दुकानात नामांकित कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर करून बनावट घड्याळांची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी १७५ मनगटी घड्याळे जप्त केली. याप्रकरणी प्रजापती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाकाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि पथकाने ही कारवाई केली.प्रजापतीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रँडेड वस्तू खरेदी करताना ब्रँडची खात्री करा, अशा फसवणुकीला बळी पडू नका.
महत्वाच्या बातम्या-
-फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?
-Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
-पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ३०० कोटींची संपत्ती? उघड चौकशीची मागणी
-‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज