बुलढाणा : बुलढाणा शहरामध्ये एक दुर्मिळ घटना समोर आली होती. जानेवारी महिन्यात ‘आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ’, असल्याची माहिती समोर आली होती. आज या महिलेची ‘प्रसुती’ झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ हे सुखरूप आहेत. लवकरच या नवजात बाळाच्या पोटातील अर्भक काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
बुलढाण्यातील ३२ वर्षीय महिलेची नवव्य महिन्यात सोनोग्राफी केली तेव्हा तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे दिसले होते. यावेळी सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या मातेला प्रसृतीसाठी बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेने सुमारे सव्वा दोन किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला आहे. नवजात बाळाच्या पोटातील अर्भकाला काढून टाकण्यासाठी अमरावती येथील शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले. तेथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पॅडियाट्रीक सर्जन उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
नवजात बाळाची शस्त्रक्रिया कधी करायची याचा निर्णय अमरावती येथील तज्ज्ञ घेणार आहे. २६ जानेवरी रोजी केलेल्या सोनोग्राफीमध्ये फिट्स इन फिटू प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. फिट्स इन फिटू असे याचे शास्त्रीय नाव असलेल्या प्रकारच्या घटना देशात १५ ते २० घडल्या आहेत. जगात अश्या दोनशे प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे या घटनेने राष्ट्रीय माध्यमाचे आणि वैदकीय क्षेत्राचे लक्ष वेधले होते.
महत्वाच्या बातम्या-
-Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
-पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ३०० कोटींची संपत्ती? उघड चौकशीची मागणी
-‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज
-औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात