Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा सध्या सोशल मीडियावर लाईव्ह कॉन्सर्ट्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून उदित नारायण यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. उदित नारायण यांनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक हीट, रोमँटिक गाणी गायली आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उदित नारायण एका महिलेसोबत थेट लिपलॉक करताना दिसले. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून रोष व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळण्यापूर्वी उदित नारायण आणि त्यांचे मित्र अभिजीत भट्टाचार्य यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिजीत भट्टाचार्यची सोशल मीडिया पोस्ट
‘मैं खिलाड़ी तू अनाडी… मेरा खिलाडी दोस्त सिक्सर पे सिक्सर… लव यू ‘, असे कॅप्शन देत अभिजीत भट्टाचार्यने व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिजीत भट्टाचार्यने उदित नारायण यांच्यासोबत पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उदित नारायण काय म्हणाले?
‘आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. आम्ही सभ्य लोक आहोत. चाहते फक्त आमच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. असे असताना या गोष्टीची चर्चा का करायची? गर्दीत बरेच लोक आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय, असं वाटतं म्हणून कोणी हात पुढे करतात तर कुणी हाताचे चुंबन (किस) घेतात… हा सगळा उत्साह आहे. याकडे एवढं लक्ष देऊ नका… , असे उदित नारायण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
-पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ३०० कोटींची संपत्ती? उघड चौकशीची मागणी
-‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज
-औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात