पुणे : महाराष्ट्रात महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरु केली. या योजनेला राज्यातील महिलांनी उत्तम प्रतिसाद देत पुन्हा एकदा राज्यात महायुतीची निवड केली. या योजनेच्या काही अटी आहेत. मात्र, या योजनेचा गैरफायदा देखील घेण्यात आला. म्हणूनच विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे.
योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार का? याबाबत राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिलांनी स्वतःहून अर्ज करून मिळालेला लाभ नाकारत आहेत. जानेवारी २०२५ पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दिड हजार रुपये प्रमाणे १० हजार ५०० रुपये अनुदान पिंपरी-चिंचवड शहरातील ३ लाख ८९ हजार ९२० महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा लाभ नाकारत अर्ज करताना दिसत आहेत.
सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेचा निकषात न बसणाऱ्या महिला घेत आहेत. मात्र, आता या अर्जांची फेरतपासणी सुरु केली असून निकषा न बसणाऱ्या महिलांनी अर्ज केला असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार या चर्चेमुळे आता अनेक महिला या योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज करताना दिसत आहेत. या योजनेचा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. तसेच शहरातील काही महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ सोडण्यासाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, त्याचा एकूण आकडा महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात
-Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज
-एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच
-मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!