पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले होते. राऊतांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण याच बैठकीत संजय राऊत यांच्यासमोर पुण्यातील पदाधिकाऱ्यांचं नाराजीनाट्य पहायला मिळालं. कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे त्या बैठकीतून निघून आले. मोकाटेंच्या अशा अचानक बैठक सोडून जाण्यावरुन ते ठाकरे सेनेत नाराज असल्याच्या चर्चेला जोर आला. त्यावर आता मोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला कोथरुडमध्ये निवडणूक लढण्यासाठी स्थानिक पदाधिकारी जे इच्छुक होते, ज्यांनी माझ्या उमेदवारीनंतर मतदारसंघात माझं काम न केलेले पदाधिकारी बैठकीत माझ्या शेजारी बसले होते. माझा स्वाभिमान अद्यापही जीवंत आहे. त्यामुळे मी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांना हा काय प्रकार असं विचारलं ते बोलले की चुकून झालं. नंतर मी संजय राऊतांना विचारलं तर ते बरोबर आहे असं म्हणाले. मग आम्ही थांबायचं की नाही, असा प्रश्न पडला. त्यामुळे मी त्या बैठकीतून निघून आलो, आणि हा विषय फक्त त्या बैठकीपुरताच मर्यादित होता”, असे चंद्रकांत मोकाटे म्हणाले आहेत.
मला सगळ्याच पक्षाचे लोक भेटतात. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. आत्ता तरी माझा निर्णय नाहीये, असं चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर बोलताना म्हणाले आहेत. तसेच आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या जाणत्या शिवसैनिकाकडे पुण्याची धुरा द्यावी, असं वाटतं का यावर बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले की, “याउलट नवीन चेहरे द्यावेत, या भूमिकेत आम्ही आहोत. पुण्यात नव्यांना संधी द्यावी, आमच्यासारखा माणूस त्यांच्यामागे उभा राहिल”
महत्वाच्या बातम्या-
-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?
-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?
-पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी १ किलोचा ‘कमळ हार’ अर्पण
-पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा!
-पुण्यात राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?