पुणे : पुणे शहरात एकीकडे लोकसंख्या, वाहतूक कोंडी वाढताना दिसत आहे. अशातच सांस्कृतिक वासरा लाभलेल्या या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढतच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात खून, बलात्कार, चोरी, दहशतवाद पसरवणाऱ्या कोयता गँग, अमली पदार्थांचे खरेदी,विक्री असे प्रकार वारंवार घडत आहे. या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षक हफ्ता घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील वानवडी भागातील हुक्का पार्लर चालकाकडून पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हा तब्बल २० हजारांचा हफ्ता घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील हफ्तेबाज पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा पोलीस उपनिरीक्षक वानवडीमधील अवैध हुक्का पार्लर सुरू ठेवण्यास तो परवानगी देत होता अशी माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी परिसरात एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी (Pune Police) या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी हॉटेल चालकाचा मोबाईल तपासला असता वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हाच वेळोवेळी माहिती करत असल्याचे समोर आले. तसेच या पोलीस उपनिरीक्षकाला संबंधित हॉटेल चालक प्रति महिना २० हजार रुपयांचा हप्ता देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांकडून विशाल पवार या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजपने पुणेकरांची फसवणूक केली’; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
-Pune GBS: पुणेकरांची चिंता वाढली; शहरात एकूण किती मृत्यू?
-कसब्यात १५ हजार महिलांच्या उपस्थितीत “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
-Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण…; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?