पुणे : पुणे शहरामध्ये ‘गुइलिन बॅरी सिंड्रोम’ (GBS) या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजाराने शंभरी पार केली तर एकाचा बळी देखील घेतला. याची दखल राज्य तसेच केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. आतापर्यंत आढलेल्या रुग्णांपैकी ८०-९० टक्के रुग्ण हे सिंहगड रोड परिसरातील आहेत. यावरुन पुणे पालिका प्रशासनाकडून सिंहगड रोड परिसरातील तब्बल ३० हजार घरांचे सर्वेक्षण केले आहे. यावरुन पालिकेने आता जीबीएस बाधित क्षेत्र जाहीर केले आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांमध्ये गुइलिन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) अधिक रुग्ण सापडत असून राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान महापालिका हद्दीतील भागाला पालिकेकडून बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पालिकेने या भागातील जवळपास ३० हजार घरांचे सर्वेक्षण केले असून अद्यापही हे सर्वेक्षण सुरु आहे.
जीबीएस आजार झालेल्या रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालायामध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच बाधित क्षेत्रातील रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा देखील लाभ दिला जाणार आहे. यासाठी शहरी गरीब योजनेचा निधी १ लाख रुपयांवरुन २ लाख करण्यात आला आहे. तसेच जे रुग्ण शहरी गरीब योजनेस पात्र नाहीत त्यांना देखील १ लाख रुपयांची मदत पालिकेकडून दिली जाणार आहे. १३ जानेवारीनंतर दाखल झालेल्या रुग्णांना या योजनाचा लाभ दिला जाणार असून पालिकेकडे अर्ज आणि हमीपत्र द्यावे लागणार आहे.
आजाराची लक्षणे –
-हातापायातील ताकद कमी होणे.
-हातापायाला मांगुया (Tingling Sensations) येणे.
-धगळण्यास व बोलणेस त्रास होणे.
-धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे
“नागरिकांनी घाबरू नये, यासाठी पथकांकडून जनजागृतीही केली जात आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळत आहे”, अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात व्हिला तर मुंबईत फाईव्हस्टार फ्लॅट, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांची ACB कडून चौकशी
-खळबळजनक! पालकांची खोटी सही केल्याचं शिक्षकांना सांगितलं म्हणून त्याने थेट सुपारीच देत…
-गुरुनं ओलांडली मर्यादा; अल्पवयीन विद्यार्थीनीला केलं प्रपोज, नकार देतात…
-‘सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही….’; सुषमा अंधारे थेटच बोलल्या