पुणे : राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गेली तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या विविध याचिकांमुळे रखडलेली निवडणूक राज्यामध्ये महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आले असल्याने लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र इच्छुकांची डोकेदुखी वाढवणारी बातमी सर्वोच्च न्यायालयातून आली आहे. आज होणारी सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता थेट दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत दाखल याचिकेबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता होती. सरकार या निवडणुका होण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं जात होतं मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात असल्याने आता निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्यांना थोडा धीर धरावा लागणार आहे.
प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण तसेच वेगवेगळ्या 20 ते 22 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायालयाने निर्णय दिला असता तर निवडणुकीचा मार्ग आजच मोकळा झाला असता. राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीच्या निवडणुक गेली तीन वर्षांपासून रखडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही….’; सुषमा अंधारे थेटच बोलल्या
-महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…
-लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा
-GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली