पुणे : इंदापूरमध्ये आज आयोजित अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसल्याचे पहायला मिळाले. तर याच कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते. सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात नाराजीनाट्य पहायला मिळाले आहे.
अजित पवार, सुप्रिया सुळे, दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे इंदापुरातील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांशी संवाद साधल्याचे पहायला मिळाले. सुप्रिया सुळेंना दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधला मात्र, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मात्र कोणतंच संभाषण झालं नसल्याचं पहायला मिळालं आहे. या कार्यक्रमामध्ये भाऊ-बहिणीतील अबोला पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळेंचा सत्कार हा प्रेक्षकांच्या रांगेतून करण्यात आला. तसेच इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघात येत असून बारामतीच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे या सरकारी कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण न दिल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार
-पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच