पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीतही वाढ होत आहे. अशातच वाहतूक नियमांचे उल्लंगन करणाऱ्यांची देखील कमी नाही. पोर्शे कार अपघातानंतर आता पुणे शहरात आणखी एक धक्कादायक अपघात झाल्याचे समोर आले आहे. हिंजवडीमध्ये भरधाव वेगाने निघालेला रेडिमिक्स डंपरने वळणावर आला आणि डंपर पलटी झाला. या डंपरखाली दोन विद्यार्थींनींना चिरडल्या गेल्या आहेत. या घटनेत दोन्ही विद्यार्थ्यीनींची जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
क्रेनच्या सहाय्याने रेडिमिक्स डंपर हटवण्यात आला असून चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डंपर खाली चिरडलेल्या विद्यार्थिनींची ओळख पटली असून या दोघीही पुण्यात शिक्षणासाठी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रांजली महेश यादव (वय – २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे, मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय – २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे, मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्यु झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत.
या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. काल (शुक्रवारी) सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यानं डंपर पलटी झाला. तब्बल ३२ टन वजन असलेल्या डंपरखाली प्रांजली आणि आश्लेषा या चिरडल्या गेल्या. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेतला त्यानंतर प्रांजल आणि आश्लेषा यांचा मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा करावा लागला. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थीनींचा या अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…
-शिंदे-पवारांच्या मंत्र्यांवर राहणार वॉच, भाजपच्या नव्या खेळीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार
-…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!