पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तसेच राजकारणातील चर्चेचा विषय म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यावरुन वाल्मिक कराडने एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला, पोलिसांना सरेंडर केलं आहे. यानंचक वाल्मिक कराड बाबत सगळ्या प्रकरणांची चौकशी सीआयडीकडून करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडची पुण्यामध्ये बेनामी संपत्ती जमल्याचा सीआयडीला संशय आहे. एफसी रोडवरील एका बिल्डींगमध्ये वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या नावावर २ ऑफिस असल्याचे समोर आले होते. सीआयडीने आता भाजपच्या माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे. पुण्यात वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. या खरेदीमध्ये दत्ता खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आल्याने सीआयडीने दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे.
‘वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता. म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलावलं होतं. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे.वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही. माझी चौकशी झाली, मी सीआयडीला सहकार्य केलं आहे’, असे माजी नगरसेवक दत्ता खाडे म्हणाले आहेत.
वाल्मिक कराडचे फर्गुसन कॉलेजच्या समोर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफिस स्पेसेस खरेदी केली आहेत. दत्ता खाडेंच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाल्याचा संशय आहे. दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडेंपासून वाल्मिक कराडला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘काम कमी नखरा जास्त’; शरद पवारांच्या आमदाराची राज्य सरकारवर आगपाखड
-बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत…; पुण्यात धक्कादायक प्रकार
-‘…तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’; देसाईंचा मंत्री मुंडेंना इशारा
-‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप
-मुंढव्यातील ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल