पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये परराज्यातून शिक्षण आणि नोकरीसाठी येत असतात. मात्र, पुण्यातील नाईट लाईफ पब संस्कृतीच्या आहारी जात शहरात ड्रग्ज, गांजा तसेच हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. तसेच सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हाॅटेल मालकासह, व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन १९१८ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर भागातील मुंढवा परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. या परिसरातील एका हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. हाॅटेलमधून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडुळे, शुभांगी म्हाळशीकर, संजयकुमार दळवी यांनी ही कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य मंडळाकडून ‘जात प्रवर्ग’चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट
-सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्…; नेमकं काय घडलं?
-पुण्याचा कारभारी कोण? मुरलीधर मोहोळांनी स्पष्टच सांगितलं
-पिंपरी-चिंचवड पाणी प्रश्न पोहचला थेट न्यायालयात; नेमका काय प्रकार?
-पुणेकरांसाठी क्रेडाईचे ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शन; गृहनिर्माण प्रकल्पांना चालना