पुणे : ‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चे उद्घाटन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी शहरातील वाढते प्रदूषण आणि बांधकाम क्षेत्रावर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित झाला. राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाकडे पुण्यातील शंभरहून अधिक मोठे बांधकाम प्रकल्प अडकले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील अनेक विकासकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. अलिकडच्या काळात या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण कनेरिया यांनी नोंदविले आहे.
‘पुण्यातील वाहतूककोंडी कमी करण्यावर आगामी काळात भर राहणार आहे. यासाठी नवीन रस्त्यांच्या बांधणीसोबत पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती देण्यात येणार आहे. नवीन विमानतळाबाबतही पावले उचलण्यात येत आहेत. शहराचा विस्तार होत असल्याने पाण्याची गरज वाढत आहे. यामुळे १ हजार ८०० किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिन्या बसविण्यात येणार आहेत’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
📍कृषि महाविद्यालय, पुणे | पुणे प्रॉपर्टी एक्स्पो शुभारंभ
क्रेडाई पुणे मेट्रो द्वारा आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी एक्सपो’ प्रदर्शनी का शुभारंभ किया। प्रदर्शनी में सम्मिलित हुए विभिन्न गृहनिर्माण पेशेवरों और निर्माण विशेषज्ञों से मुलाकात की और उन्हें प्रदर्शनी के लिए बधाई दी।
पुणे शहर… pic.twitter.com/9MK3moApWb
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 17, 2025
पुणेकरांसाठी दर्जेदार, परवडणारी आणि आरामदायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्रेडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेले हे ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनामुळे नागरिकांना शहरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांची सविस्तर माहिती मिळेल. त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास कसा करता येईल, पर्यावरणपूरक घरे कशी बांधता येतील? यावर मार्गदर्शन करण्यासाठी सेमिनारचेही आयोजन करण्यात आले आहे, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
विकासकांकडून नियमांचे पालन केले जात असून, काही कार्यकर्ते विकासकांना लक्ष्य करीत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. नियामक संस्थांकडून नोटीस मिळाल्यानंतर विकासक त्रुटी दूर करत आहेत. तसेच सरकारने गृहनिर्माण क्षेत्रावरील कर कमी केल्यास घरांच्या किमती कमी होऊन ग्राहकांना फायदा होईल. याचबरोबर ग्राहकांसाठी गृहकर्जावरील सवलतीची रक्कमही सरकारने वाढवावी. यातून परवडणाऱ्या घरांची विक्री वाढण्यास मदत होईल, असे मत क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दहावी-बारावी बोर्ड: हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण
-दिल्लीतून आणलेल्या बनावट नोटांची पुण्यात वटवणी; पोलिसांनी केला पर्दाफाश
-राज्यात सीबीएसई पॅटर्नबाबत महत्वाचा निर्णय; शालेय शिक्षणंत्र्यांनी केली घोषणा
-अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी