पुणे : पुणे शहरात चोरी, लूट, बलात्कार, हत्या यांसारखे गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. काही दिवसांपूर्वीच स्वारगेट पोलिसांनी चोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.
निलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दिल्लीतून आणलेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल साडे दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा प्रकरणी दिल्ली सह, गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन असल्याचंही उघडकीस आलं आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी निलेश वीरकर याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न करत होता. त्याने शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी वीरकरला नवी मुंबई येथे नेत शाहीदलाअटक केली. चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या पाचशेच्या २ हजार नोटा जप्त केल्या आहेत. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात सीबीएसई पॅटर्नबाबत महत्वाचा निर्णय; शालेय शिक्षणंत्र्यांनी केली घोषणा
-अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी
-किरीट सोमय्यांचा मोठा दावा; ‘…तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंसोबत होता’
-पुण्यात कंटेनरचा थरार; भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीसकट २०-२५ गाड्या उडवल्या