पुणे : फूड डिलव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या एका चोरट्याने घरफोडी केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. या प्रकरणी चोरट्याला तसेच त्याच्या साथीदार सराईत गुंड तसेच सराफ व्यावसायिकाला स्वारगेट पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. २०२५ या वर्षात पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे.
गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३५, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता), सराफ व्यावसायिक भीमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सहायक आयुक्त राहुल आवारे यावेळी उपस्थित होते.
या चोरांनी डिलिव्हरी बॉयच्या वेशात आधी रेकी केली. त्यानंतर चोरी करण्यासाठी जाताना त्यांनी वेगवेगळे जॅकेट्स, केसांचा विग, टोपी असा पेहराव करत तिघांनी मिळून शहरातील अनेक भागात चोरी केली आहे. या चोरट्याकडून ८६ तोळे सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, १ दुचाकी वाहन, ०२ पिस्तूल, ०५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्र असा १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
‘पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की, काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल ३००० सीसीटिव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली. काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःची ओळख लपवण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे’, अशी माहिती पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऐकावं ते नवलंच! भूक लागली म्हणून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर नाहीच मिळाली पण…
-लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता मिळाला पण…; भुजबळांच्या वक्तव्याचा योजनेवर परिणाम?
-‘महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साप करणार’; शंकर जगताप यांचा विश्वास
-पुण्याच्या बहाद्दराची कमाल, लग्नाच्या अमिषाने २५ महिलांना लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या