पुणे : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरामध्येही भाजपने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप हे पिंपरीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी ‘२०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करू’, असा विश्वास भाजप शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विविध योजना, उपक्रम भाजप राबवत आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. पिंपरी- चिंचवड शहरात एक हजार ४४२ बूथ आहेत. आमचे बूथप्रमुख तयार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एक हाती सत्ता आणायची आहे, असे शंकर जगताप म्हणाले आहेत.
‘२०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली होती. २०१७ पेक्षा अधिक नगरसेवक आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचे शंकर जगताप यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, सध्या स्वबळावर की महायुती म्हणून आगामी महानगरपालिका लढणार हे स्पष्ट नाही. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर पुढील रणनीती ठरणार आहे’, असेही शंकर जगताप यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या बहाद्दराची कमाल, लग्नाच्या अमिषाने २५ महिलांना लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या निकटवर्तीयाचं मोठं वक्तव्य
-RTE ऑनलाईन प्रवेश अर्जाला आजपासून सुरवात; असा भरा अर्ज…
-महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?