पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. ‘मला सातारा जिल्ह्यातून धमकीचा फोन आला आहे. तू तुझ्या घरचं बघ, या भानगडीत पडू नको. तुझ्या मागं कुत्र नाही, अशी धमकी देण्यात आली. मात्र माझ्या मागे कोण हे समाज ठरवेल. जीवे मारण्याच्या धमक्या या वारंवार येत आहेत. या धमक्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी’, असं म्हणत आज लक्ष्मण हाके यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. मी कधीच आरोपीचं समर्थन केलेलं नाही. परंतु लक्ष्मण हाके हा जातीयवादी आहे, आरोपींची बाजू घेतो. असे आरोप होतात. एखाद्या जातीला क्रिमीनल ठरवू नका, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका, शिक्षकांचा काय संबंध, असे म्हटल्यावर मला रोज जीव मारण्याची धमकीचा काॅल येत आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना, याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’, असे लक्ष्मण हाके यांनी म्हणाले आहेत.
दरम्यान या पत्रकार परिषदेतून लक्ष्मण हाके यांनी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील मुलाच्या हत्या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. ‘लातूर जिल्ह्यात धनगर समाजाच्या मुलाची प्रेम प्रकरणातून हत्या झाली. उच्च जातीच्या लोकांनी, ज्याचे अभिमन्यू पवार यांच्यासोबत फोटो असलेल्या माणसांनी १८ वर्षांच्या मुलाची हत्या केली. या प्रकरणी आम्ही आवाज उठवल्यानंतर ६ जणांना अटक झाली आहे. अजून काही आरोपी पसार आहेत’, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…
-‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही’; शरद पवारांच्या खासदाराला मोरेंनी सुनावलं