पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित विजय मिळाला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला मोठा विजय मिळाला. विधानसभेला मिळालेल्या अपयशावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अजूनही सावरले नाहीत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष अजूनही झोपेत आहे’, असं वक्तव्य केलं. यावरुन आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कोल्हेंच्या वक्तव्यावर आता शिवसेना नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
‘खासदार साहेब जर निवडणूका झाल्यानंतर म्हणत असतील की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजुन झोपेतून जागा झाला नाही तर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवावी आम्ही शिवसेना म्हणून चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते… एका जत्रेने देव म्हातारा होत नाही’, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
मा. खासदार साहेब जर निवडणूका झाल्यानंतर म्हणत असतील की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजुन झोपेतून जागा झाला नाही तर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवावी आम्ही शिवसेना म्हणून चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते…
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही… pic.twitter.com/XspcOvRoZf
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) January 11, 2025
दरम्यान, एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या परभवानुसार वादाची ठिणगी पडल्याचं पहायला मिळत आहे. अमोल कोल्हे यांनी मित्रपक्ष असलेल्या केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना नेते वसंत मोरेंच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर आता हा वाद इथेच थांबणार की पुढे उफाळला जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेसेना स्वबळावर लढणार; ‘हा तर शिवसैनिकांचा विश्वासघात’
-‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम…’; अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना
-पुण्याला २ हजार कोटींचा निधी द्या; काँग्रेसची अर्थमंत्री पवारांकडे मागणी
-बारामतीत पवार काका-पुतणे एकाच मंचावर; राजकीय घडामोडीकडे राज्याचं लक्ष