पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारत्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अॅक्टीव्ह मोडमध्ये आहेत, असंही वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं.
सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील विकास कामांबाबत मॅरेथॉन बैठका घेतल्या. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देखील ॲक्टिव्ह मोडमध्ये येण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्र्यांसाठी पत्रक काढत महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. पक्ष कार्यालयाला एका दिवशी तीन वेळेत तीन मंत्री हजेरी लावणार आहेत. या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम संभाळून पक्षाच्या कार्यालयात हजर रहा. काम झालं नाही म्हणून पक्षाच्या कार्यालयातून व्यक्ती जाता कामा नये’, अशा देखील सूचना अजित पवारांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. पक्षातील मंत्र्यानी सर्वसामान्य जनतेशी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी विविध खात्याचे मंत्र्यांनी पक्षकार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याला २ हजार कोटींचा निधी द्या; काँग्रेसची अर्थमंत्री पवारांकडे मागणी
-बारामतीत पवार काका-पुतणे एकाच मंचावर; राजकीय घडामोडीकडे राज्याचं लक्ष
-‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा