पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मावळ विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली होती. मावळ पॅटर्नची निर्मिती करणारे भाजप नेते बाळा भेगडे यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. बाळा भेगडे हे भाजपमध्ये आहेत की नाही? मावळ पॅटर्नला भाजपचा छुपा पाठिंबा होता का? असे अनेक प्रश्न पडले होते. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बाळा भेगडे यांच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला हजेरी लावल्याने हेच प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी खुलासा केला आहे.
बाळा भेगडेंच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महायुतीचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधातील उभारलेल्या ‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता का? असा प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला आहे.
मी वारंवार सांगतो आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचंच तिथे काम केलं आहे. काही कार्यकर्ते उमेदवारीवरून नाराज होते. पण नंतर सर्व कार्यकर्त्यांनी मिळून महायुतीचं काम केलं आहे. राहिला प्रश्न बाळा भेगडेंचा यांच्या बद्दल एक शिस्तभंग समिती आहे. भाजपच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी माहायुतीचं काम केलं आणि महायुतीलाच मदत केली आहे, असे चंद्रशेखरर बावनकुळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण
-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले
-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य