पुणे : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची अल्हाट यांचा पक्षप्रवेश झाला. पुण्यात भाजप कार्यालयामध्ये या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत, ‘खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच’ असं नगरसेवकांनी म्हंटलं. यावरुन आता पुणे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.
उबाठा गटाच्या काही नगरसेवकांनी दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या पाचही नगरसेवकांना खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती तर तुम्ही पक्षांतर का केलं? जर शिवसेना ठाकरेंची वाटत आहे तर तुम्ही पक्ष सोडायला नव्हता पाहिजे. त्याच पक्षामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे होतं. खरंतर आम्हाला कोणावरती टीका अजिबात करायची नाही कारण ते महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मिठाचा खडा पडू नये ही शिवसेना काळजी घेणार आहे”, असे शिवसेना शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे.
“विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे ५७ आमदार निवडून आले. तर या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे आमदार पाहता महाराष्ट्राच्या जनता कोणाच्या पाठीशी आहे हे सांगण्याची विशेष आवश्यकता नाही. निवडणूक आयोगाने देखील सांगितलं आहे, शिवसेना कोणाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाणाचे चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व असलेल्या शिवसेनेला दिलेले आहे. त्यामुळे जे कोणी चार-पाच नगरसेवक महायुतीत आलेले आहेत त्यांनी थोडसं आत्मचिंतन करावं. त्यांना अजूनही असं वाटतंय की, आपण अजून उद्धव ठाकरेंच्याच पक्षाचे आणि उद्धव ठाकरेंची अजून युती भाजपसोबत आहे. तर त्यांनी थोडं अभ्यास करावा”, असं शिंदेंच्या शिवसेनेचे पुण्यातील पदाधिकारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले
-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’
-‘घोडगंगा कारखाना’ अजित पवारांच्या रडारवर; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अशोक पवारांचं टेंशन वाढलं
-पुण्यात नेमकं चाललंय काय? शिपायानेच केला विद्यार्थिनींचा चेंजिंगरूममध्ये व्हिडिओ शूट