पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच येरवडा कारागृहातून बाहेर आलेल्याआरोपीच्या समर्थकांनी काढलेली बाईक रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना पुण्यातील कोयता गँग आणि इतर वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुणे पोलिसांच्या कामावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
“राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करण्यात अडचण येत नाहीत. पुण्यात अजिबात राजकीय हस्तक्षेप होत नाही, तर मग गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस कमी पडत आहेत. वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं आणि काम सोडावे. आम्ही दुसरे आधिकारी आणू”, अशा शब्दांत अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
‘पीएमपीच्या ताफ्यात टाटाच्या २०० नवीन बस घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. माध्यमांशी बोलण्यासाठी मी बैठका थांबवून आलो आहे. मी परत जाणार आहे. त्यात पुण्यातील गुन्हेगारीवर चर्चा करणार आहे’, असेही अजित पवार म्हणाले आहे. तसेच अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर आज पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या-
-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’
-‘घोडगंगा कारखाना’ अजित पवारांच्या रडारवर; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अशोक पवारांचं टेंशन वाढलं
-पुण्यात नेमकं चाललंय काय? शिपायानेच केला विद्यार्थिनींचा चेंजिंगरूममध्ये व्हिडिओ शूट
-वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुख्यबाजार पेठेत उभारू लागल्या, तक्रार करण्यासाठी आमदार थेट पोलिसांत