पुणे : पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबाग तसेच शिवाजी रस्ता परिसरात नागरिकांची कायम वर्दळ असते. याच परिसरात असणाऱ्या बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला बेकायदेशीरपणे मुख्य बाजारपेठेच्या भागामध्ये येऊन थांबत असल्याची तक्रार स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला गेली काही दिवसांपासून तुळशीबाग, मंडई तसेच मुख्य शिवाजी रस्त्यावर उभ्या राहत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे परिसरामध्ये राहणारे रहिवाशी विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी माझ्याकडे केले आहे”, असे कसबा पेठचे भाजप आमदार हेमंत रासने म्हणाले आहेत.
बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला गेली काही दिवसांपासून तुळशीबाग, मंडई तसेच मुख्य शिवाजी रस्त्यावर उभे राहत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे परिसरामध्ये राहणारे रहिवाशी विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे आपली वस्ती सोडून नागरी भागात येणाऱ्या महिलांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी हेमंत रासने यांनी पोलीस उपायुक्त गिल यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट
-…म्हणून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाचा खून; तपासात धक्कादायक कारण आलं समोर
-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्…
-फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?
-बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक