पुणे : पुणे शहरातील विमाननगरमधील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणीची तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने हत्या केली. कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, कात्रज) असे आरोपीचे नाव त्याने शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. शुभदाच्या खून प्रकरणी तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी कृष्णाला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. कृष्णाच्या पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शुभदाने तिच्या वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशनसाठी, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून कधी २५ हजार तर कधी ५० हजार रुपये अशी रक्कम कृष्णा सत्यनारायण कनोजाकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते. तरी देखील शुभदा पैसे मागणायची थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला. शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराडला जाऊन तिच्या वडिलांना भेटला. तेव्हा त्यांनी आपली कसली शस्त्रक्रिया झाली नाही की, शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही, असे शुभदाच्या वडिलांनी सांगितले असल्याचे आरोपी कृष्णाने पोलिसांना सांगितले आहे.
आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच तो तिला उसने घेतलेले पैसे परत मागत होता. तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दु:खातून त्याने कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव घातला. त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या. ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले आणि घडली हकिकत त्याने पोलिसांना सांगितली. मात्र, शुभदाच्या नातेवाईकांकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्…
-फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?
-बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक
-दोघेही एकाच कंपनीत कामाला, त्याने तिला भर रस्त्यात अडवलं अन्…पुण्यातील धक्कादायक घटना