पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी पार्लरचालक महिलेला अटक केली आहे.जोयश्री नरेन तामोली (वय ३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या मसाज पार्लर चालक महिलेचे नाव आहे.
धायरीमधील ‘डे स्पा’ या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी छापा टाकला आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय चालवल्याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी सिंहगड रोड परिसरातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात ‘डे स्पा’ या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली या महिलेला अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?
-बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक
-दोघेही एकाच कंपनीत कामाला, त्याने तिला भर रस्त्यात अडवलं अन्…पुण्यातील धक्कादायक घटना