Social Media : भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया अॅप्लिकेशनमुळे अनेकदा काही चुकीच्या बातम्या पसरत असतात. यावर उपाय म्हणून आता मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकर बर्गने मंगळवारी एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात घोषणा केली आहे. ‘फॅर्च-चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आला असून कम्युनिटी नोट्स ही नवीन पॉलिसी आणली आहे. या बदलाची सुरुवात अमेरिकापासून होणार आहे. आता फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये एक्स म्हणजेच ट्विटरसारखे ‘कम्युनिटी नोट्स’ प्रोग्रामद्वारे बदल करण्यात आला असल्याचं मार्क झुकर बर्गने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
“आम्ही फॅक्ट चेकर्सपासून मुक्त होत आहोत आणि आता फॅक्ट चेकिंग प्रोग्राम ‘कम्युनिटी नोट्स’द्वारे बदलले जात आहे. आम्ही हा प्रोग्राम युएसमध्ये सुरु करत आहोत. कोणती बातमी खरी आणि कोणती चूक हे आधी कंपनी ठरवायची. यासाठी कंपनी इतर लोकांना फोन करायची आणि थर्ड पार्टीची मदत घ्यायची. पण आता मेटाकडून यामध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी मेटा कम्युनिटी नोट्स सुरु करत आहे. युजर्स स्वतः कोणत्याही बातमीबद्दल त्यांचे मत देऊ शकतात आणि त्यांना ही बातमी योग्य की अयोग्य वाटते हे सांगू शकतात”, असे मार्क झुकर बर्गने म्हटलं आहे.
दरम्यान, मेटा कंपनीकडून फेसबूक आणि इन्स्टाग्राममधील पॉलिसी बदलली गेली असून आता थर्ड पार्टी, फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आले आहेत. या कम्युनिटी नोट्स प्रोग्रामचे फिचर्स आता एलॉन मस्क यांच्या ट्वीटरप्रमाणे बदल करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक
-दोघेही एकाच कंपनीत कामाला, त्याने तिला भर रस्त्यात अडवलं अन्…पुण्यातील धक्कादायक घटना
-‘गुंडांनो, पुणे शहर सोडा अन्यथा तुमच्या ७ पिढ्या…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम