पुणे : सध्या भारतात एआय म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चांगलीच चर्चा आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करु प्रत्येक क्षेत्रात गतिमानाता आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतासाठी देखील एआय तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे समोर आले आहे. आता बारामतीमध्ये एआयचा वापर करुन ऊसाच्या उत्पादन क्षमता वाढल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावर आलेल्या मायक्रोसॉप्ट कंपनीचे चेअरमन सत्या नंडेला यांनी बारामतीला भेट देऊन विशेष कौतुक केले आहे.
It was great to meet the team at ADT Baramati today, who are using our AI tools to help farmers grow healthier, more sustainable harvests. https://t.co/8vB8vkelDs
— Satya Nadella (@satyanadella) January 8, 2025
बारामतीचे शेतकरी सुरेश जगताप यांनी एआय तंत्रज्ञान वापरुन ऊस उत्पादन घेतले. बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे वैज्ञानिक आणि मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली. त्यावरुन ‘बारामती येथील ADT टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या AI टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत’, असे ट्विट करत सत्या नाडेला यांना कौतुक केलं आहे.
Thank you @satyanadella for highlighting the benefits of AI for agriculture. We at ADT Baramati are committed to bring to the farmers the latest technologies available in order for them to benefit from the same, and are committed to work with Microsoft to ensure the technologies… https://t.co/WRb9W60ByU
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 8, 2025
सत्या नाडेला यांनी कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करुन सत्या नाडेला यांचे आभार मानले आहेत. ‘शेतीसाठी AI चे फायदे हायलाइट करण्यासाठी आपले आभार. बारामतीमधील शेतकऱ्यांना AI चा फायदा मिळवून देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ADT सह आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल याची खात्री देत Microsoft सोबत काम करण्यास वचनबद्ध आहोतट, असे शरद पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दोघेही एकाच कंपनीत कामाला, त्याने तिला भर रस्त्यात अडवलं अन्…पुण्यातील धक्कादायक घटना
-‘गुंडांनो, पुणे शहर सोडा अन्यथा तुमच्या ७ पिढ्या…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘कौटुंबिक विषय…’