पुणे : पुणे शहरातील दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अशातच आता शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमाननगर येथील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचा तिच्याच कंपनीतील एकाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव असून शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज, पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. शुभदा आणि कृष्णा ‘डब्ल्यूएनएस आयटी’ कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते.
कृष्णाकडून शुभदाने काही उसने पैसे घेतले होते. शुभदाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दोघांच्यात वादही झाले होते. सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाले. यातून कृष्णाने धारदार चाकूने शुभदावर वार केले. सुरक्षारक्षकांनी शुभदाला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुंडांनो, पुणे शहर सोडा अन्यथा तुमच्या ७ पिढ्या…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘कौटुंबिक विषय…’
-HMPV व्हायरसवर उपचार कसे करायचे? पालिकेच्या आरोग्य अधिकारी बोराडेंनी दिली महत्वाची माहिती
-‘महापालिकेच्या खात्यात ७ कोटी रक्कम पडून, पालिका व्याज मिळवण्यात व्यस्त’; वेलणकरांचा आरोप