पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे, गुंडगिरी, दहशतवाद पसरवण्यासाठी कोयता गँगसारखे प्रकार घडत आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांना सज्जड दम दिला आहे. “शहरात अवैध धंदे, बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावणाऱ्यांनी आणि शहरात गँग तयार करून परिसरात दहशत माजवणाऱ्यांनी त्वरित पुणे शहर सोडून जावे, अन्यथा तुमच्या सात पिढ्या आठवण काढतील”, असा सज्जड दम अमितेश कुमार यांनी दिला आहे.
पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ पाचच्या वतीने गुन्ह्यातील जप्त केलेले सोन्याचे दागिने, मोबाइल आणि वाहने अशा किमती मुद्देमालाच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन वानवडी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना अमितेश कुमार यांनी सज्जड दम दिला आहे.
‘लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जनता हे आमचे कान आणि डोळे आहेत. तुमच्या मदतीनेच आम्ही शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखू शकतो. त्यामुळे जनता आणि पोलिसांचा संवाद वाढवणे अधिक गरजेचे आहे. यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत. तसेच आपल्या पोलीस ठाण्यात ओढून आणलेली व गुन्ह्यातील जुनी वाहने, मुद्देमाल यांच्या मालकाशी संपर्क करून तो मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया करून त्यांना द्यावा,’ असे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘कौटुंबिक विषय…’
-HMPV व्हायरसवर उपचार कसे करायचे? पालिकेच्या आरोग्य अधिकारी बोराडेंनी दिली महत्वाची माहिती
-‘महापालिकेच्या खात्यात ७ कोटी रक्कम पडून, पालिका व्याज मिळवण्यात व्यस्त’; वेलणकरांचा आरोप
-पुणे विमानतळावर भाजप युवा मोर्चा सचिवाला अटक; बॅगेत सापडले पिस्तूल अन् २८ जिवंत काडतुसे
-अजितदादा तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंपाशी? भर सभेत सुरेश धस यांचा सवाल