पुणे : जगभरात कोरोनाच्या महामारीने चांगलंच थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा अनेक देश धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. अशातच चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटाप्युमो) या व्हायरस चीनमध्ये प्रचंड वेगाने पसरत असून आता भारतात देखील या व्हायरसचा शिरकाव झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले. तर आता महाराष्ट्रातील नागपूरमध्ये देखील या विषाणूची लागण झालेले २ रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे.
HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात आल्याने पुण्यात प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचे पहायला मिळत आहे. ‘हा व्हायरस धोकादायक नाही, त्याचबरोबर याच्या उपचार पद्धती माहिती आहे. त्यामुळे घाबरू नका. सावध रहा’, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी दिली आहे. मात्र, तरीही काळजी घेणं आवश्यक आहे.
हा व्हायरस नवीन नाही. उपचार पद्धती माहिती आहे. इतर व्हायरस प्रमाणे हा व्हायरस आहे. कोरोनासारखा नाही. श्वसन संथेच्या वरच्या भागाला इजा करतो. लहान मूलं आणि ज्येष्ठांमध्ये जास्त प्रमाणात आढळू शकतो. त्यांच्या फुफुसांपर्यंत हा व्हायरस जाऊ शकतो. मात्र बाकी वयोगटातील नागरिकांमध्ये श्वसन संस्थेच्या वरचा भागात इन्फेक्शन होतं. घाबरू नका. सावध रहा. सर्दी खोकला झाल्यावर जी काळजी घेतो तशीच काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी खबरदारी म्हणून मास्क वापरा. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी तसा आहार घ्या, असे नीना बोराडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
कशी काळजी घ्याल?
-खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
-टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
-साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
-ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
-भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
-संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
-आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
महत्वाच्या बातम्या-
-‘महापालिकेच्या खात्यात ७ कोटी रक्कम पडून, पालिका व्याज मिळवण्यात व्यस्त’; वेलणकरांचा आरोप
-पुणे विमानतळावर भाजप युवा मोर्चा सचिवाला अटक; बॅगेत सापडले पिस्तूल अन् २८ जिवंत काडतुसे
-अजितदादा तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंपाशी? भर सभेत सुरेश धस यांचा सवाल
-संतोष देशमुख प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा; मनोज जरांगे पाटील मोर्चा अर्धवट सोडून का गेले?
-जनआक्रोश मोर्चाला पुण्यातील आमदार अन् खासदार गैरहजर; सुरेश धस म्हणाले “त्यांना रविवारी…”